पुस्तक परिचय —
Breaking Through – My Life in Science
Katalin Kariko
October 2026; आनंदसुत (Ranjan Marathe), Denver CO.
कातालीन “काती” करिको आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ Drew Weissman यांना २०२३ सालचे नोबेल पारितोषिक त्यांच्या mRNA च्या शोधार्थ मिळाले. २०२० च्या कोविड महामारीवर मात करण्यात त्यांच्या संशोधनाचा अमूल्य वाटा होता. त्यांनी आपण सर्वांचे प्राण तर वाचविलेच, पण एकदम भयाण व भयावह होत चाललेली आपली मोठमोठी शहरे पुन्हा वसविली. No Traffic चे एकाकीपण घालविण्यात बाईंचे खूप योगदान आहे. त्यापुढेही जाऊन शाळा सुरू होणे, माणसे एकमेकांना भेटणे, खेळ, यात्रा—सगळे काही. तर आपल्या जिद्द, चिकाटी व परिश्रम यांच्या बळावर महत्त्वाचे शोध घेणाऱ्या कातीच्या प्रेरणादायी आयुष्याचा आपण थोडासा कवडसा घेऊ.
खरे म्हणजे प्रत्येकाने हे सुमारे ३२० पानांचे छोटेखानी पुस्तक वाचायलाच हवे. काती हंगेरीमधून शिकून सवरून अमेरिकेत आली; त्यामुळे तिची मातृभाषा हंगेरियन; इंग्रजी नव्हे. आपल्यापैकी बरेचजण अगोदर विचार मराठीत करतात व नंतर इंग्रजीमध्ये व्यक्त होतात; तसाच त्यांच्या बाबतीत हंगेरियन व इंग्रजीचा संबंध. त्यामुळे त्यांची भाषा फारच सुगम, बाळबोध व साधी आहे. एकदम आपल्या साने गुरुजींची आठवण करून देणारी. साधी व सोपी. या पुस्तकामधील मला भावलेले प्रसंग नोंद करण्याचा इथे प्रयत्न आहे. कदाचित माझे लिखाण वाचकाला मूळ पुस्तक हुडकून काढून वाचण्याची प्रेरणा देईल. वाचाल तर वाचालच. माझा लेख एक gateway drug म्हणून प्रेरक होईल.
सुरुवातीला पुस्तकातील दोन प्रसंग उद्धृत करतो. नंतर मी या पुस्तकापासून काय शिकलो ते सांगतो. आणि मग संपवतो. फार वेळ नाही घेणार.
मे २०१३. मी सकाळी neurosurgery department मधील माझ्या लॅबमध्ये पोहोचले; आणि पाहते तो काय—माझी सगळी सामग्री हॉलवेमध्ये फेकलेली. माझी खुर्ची, माझे journals, माझी Lab मधील तबकडी, माझे wall papers, माझे test tube boxes—सगळे सगळे इकडे तिकडे विखुरलेले. फेकूनच दिलेले म्हणा ना.
माझ्या lab चा न्यूरोसर्जरी तंत्रज्ञ माझ्या सगळ्या वस्तू एका कागदी पेटीमध्ये पटापट कोंबत होता. जवळच एक मोठी कचऱ्याची पेटी होती; त्यामध्ये तो माझ्या सर्व गोष्टी फेकत होता. माझ्या सर्व गोष्टी.
“काय चाललंय नेमकं इथे?” मी विचारले. अजून एक पेपरांचा गठ्ठा गेला कचऱ्याच्या पेटीत. आणि पिपेटची खोकी पण.
“आम्हाला ही जागा हवी आहे,” तो शांतपणे म्हणाला. “शॉन म्हणाला, आम्हाला ही जागा मोकळी करायला हवी.” त्याने अजून काही test samples कचऱ्यात फेकून देण्यासाठी हातात घेतले.
“माझ्या samples ना हात लावू नकोस!” मी जवळजवळ किंचाळलेच. तो थोडासा बाचकळला, पण थोडासाच. पुढील क्षणी तो पुढील samples कचऱ्याच्या पेटीत फेकण्यासाठी लगेचच सरसावला.
“त्यांना हात लावू नकोस!” मी पुन्हा ओरडलेच.
“काती,” तो म्हणाला; आणि पुढील test samples कचऱ्यात फेकत तो निर्विकारपणे म्हणाला, “तू जरा शॉनबरोबर बोलून बघ.”
शॉन माझ्याबरोबर ‘चर्चा’ करायला अगदी तयारच बसला होता. “काती,” तो म्हणाला. मला तर त्याच्या स्वरांमध्ये teenager बरोबर पालकांच्या चालणाऱ्या सुसंवादाची झलक आढळली. आणि कुठल्याही सुजाण, हुशार, जास्त चांगले पाहू शकणाऱ्या teenager प्रमाणे मी म्हटले,
“I know, I am not that stupid!”
शॉनरावांनी आपले आख्यान चालूच ठेविले. “काती, काती, आपण या विषयावरती मागील १७ वर्षे बोलतच आहोत. तुझा research बरा आहे; पण तू funding आणायला हवीस. आकडे दाखवायलाच हवेत.” लगेच माझ्या डोळ्यांसमोर मी एका कारखान्यात काम करणारी मजूरच आहे हे चित्र तरळून गेले.
“मी नवीन faculty hire केली आहे. त्यांना funding आहे. तुझ्या lab ची जागा त्यांना द्यावी लागणार आहे. त्यांच्याकडे धन आहे. व्यवस्था अशीच चालत आलेली आहे.”
मूलभूत संशोधनातील महादेवासमोर बसलेले असे किती पुष्ट नंदी असतील? असा थोडासा हताश विचार करून animal house—पशुशाळेजवळच्या एकदम लहानशा प्रयोगशाळेत—मी माझा मोर्चा वळवला. त्या एवढ्याशा चिमुकल्या जागेत मी RNA सारख्या नाजूक व नजाकतदार molecule वरती काय काम करणार होते, ते देवालाच माहीत!
प्रसंग दुसरा —
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार —
“काती—समस्त जगाला तुझ्या संशोधनाची गरज आहे.”
“काती—science मधील new frontiers तुझ्या हातून त्यांची उकल होण्याची वाट बघत, ताटकळत बसले आहेत.”
ह्या दोन्ही गोष्टी कुणीच मला सांगणार नव्हते. Science मध्ये त्या वेळेपर्यंत माझे काहीच योगदान नव्हते. I was a no one in science. पात्रतेची हीच गोष्ट असते. पात्रता असूनही त्याजोगे दाखवण्यासारखे मजजवळ जर काहीच नसेल, तर मी पात्र नाहीच ना? हाच खरा गहन प्रश्न.
कातीच्या मनात वरील विचार ती एक अगदी नवीन post-doc शास्त्रज्ञ असताना आले. आपणाला येथून तिची scientist म्हणून कशी जडणघडण झाली त्याचा प्रत्यय येतो.
हे दोन प्रसंग वाचून आपणास मी सर्वांनी हे पुस्तक मुळापासून का अभ्यासावे वाटते याची प्रचीती आलीच असेल. उत्तरार्धात मी या पुस्तकातून काय शिकलो ते points format मध्ये नमूद करतो. प्रत्येक मुद्दा एकेक निबंधाचा विषय होईल; पण माझा लेख एक gateway drug म्हणून प्रेरक होईल असा उद्देश असल्यामुळे मी मुद्देच लिहिणार आहे.
१) Hungary आणि भारत जवळजवळ एकाच वेळी स्वतंत्र झाले. दोन्ही देशांनी बऱ्यापैकी समाजवादी पद्धती चोखाळली. Hungary ला तर दुसऱ्या महायुद्धाची बरीच झळ बसली. तरी पण Hungary science मध्ये / frontier research मध्ये भारताच्या मागे गेला का? Nobel Laureates च्या संख्येवरून सकृतदर्शनी असे दिसते. असे का असावे? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
२) Fun in science. हा फारच महत्त्वाचा मुद्दा. कातीच्या प्रवासामध्ये तिच्या परिश्रमाची व संघर्षाची कथा आहे; पण कुठेही ती तिचे काम कंटाळवाणे आहे असे म्हणत नाही. बऱ्याच वेळा तर ती एखादी Rock star असावी असे भासते. बऱ्याच वेळी हा मुद्दा discuss होत नाही—आपल्याला आवडणारे आणि भावणारे काम करायला मिळणे ही एक पर्वणीच असते. ती कलाकार, शास्त्रज्ञ व जगतगुरूंना मिळते; सर्वांना करायला मिळाले तर फारच मजाच येईल.
३) शेवटी—science ची कास धरून, विवेकाची कास धरून भारतासारख्या देशाने आपली वाटचाल सुरू ठेवली तर कदाचित २०५० मध्ये—“धनंजय मानेंना डायबेटीसवरती औषध आणायला चाकणला जावे लागेल, इस्रायलला नाही.”
मूळ लेख: https://priyaranjanmarathe.substack.com/p/katalin-kariko-my-life-in-science