r/kolhapur • u/Raahul_13 • 22h ago
Ask Kolhapur जनगणना नाही, पण डीलिमिटेशनची घाई! पडद्यामागचा सत्तेचा खेळ नेमका कोणासाठी?"
जनगणना २०२१ ची झालीच नाही, पण डीलिमिटेशनची प्रक्रिया मात्र पुढे जाणार! राजकारणात पडद्यामागून सूत्रं कशी हलवली जातात, याचं हे एक वेगळंच उदाहरण म्हणावं लागेल.
आता महाराष्ट्राची लेक लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात दिसली, तर आश्चर्य वाटायला नको!
यालाच म्हणतात, बीच कँडी हॉस्पिटलमधूनही राजकारणाची सूत्रं हलवणारा वस्ताद!
दिल्लीच्या राजकारणात शरीर कुठे आहे, यापेक्षा राजकीय खेळी कुठून सुरू आहेत, याचीच चर्चा अधिक रंगताना दिसतेय.
पण खरा प्रश्न असा आहे की, देशाच्या लोकशाहीशी संबंधित इतके महत्त्वाचे निर्णय घेताना जनतेला विश्वासात घेतलं जातंय का? की सत्तेच्या सारीपाटावरचे डाव आधीच ठरले आहेत?